वाराणसी : भारतीय लष्करानं 29 सप्टेंबरला पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीयांनी छोटी दिवाळी साजरी केल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाराणसीमध्ये झालेल्या रॅलीत मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. देशवासियांनी लष्कराला पाठिंबा दिल्याबद्दल मी आनंदी आहे तसंच मला अभिमान असल्याचंही मोदी म्हणाले आहेत.


दिवाळीनिमित्त जवानांना शुभेच्छा देण्याचं आवाहन मोदींनी भारतीयांना केलं आहे. #Sandesh2Soldiers हा हॅशटॅग वापरून नरेंद्र मोदी अॅप किंवा mygov.in या वेबसाईटवर तुम्हालाही जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देता येतील.