नवी दिल्ली, मुंबई : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सैन्यदलानं केलेल्या कारवाईचं देशभरात स्वागत होत आहे. मुंबईत भाजप कार्यालयाबाहेरही फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:च्या देशात चालणाऱ्या दहशतवादी कारवायांना अटोक्यात ठेवण्यास जर पाकिस्तान असमर्थ असेल आणि त्यामुळे जर शेजारी देशाला त्रास होणार असेल तर भारताने केलेली ही कारवाई योग्यच आहे, असे मत माजी राजदूत विवेक काटजू यांनी व्यक्त केले.


भारताच्या कारवाईचे समर्थन वायुसेनेचे माजी प्रमुख फाली मेजर यांनी केले आहे. मात्र, आपण नेहमी सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन केलेली कारवाई पाहता सीमारेषेवर सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सध्या ‘एल.ओ.सी’वर तणावाचे वातावरण आहे. 


संरक्षण विश्लेषक मनमोहन सिंग यांनी ही कारवाई अतिशय विचारपूर्वक करण्यात आली आहे असे म्हटले आहे. भारताने केलेली ही एकंदर कारवाई पाहता आम्ही देखील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरास पात्र आहोत हे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.


भारतीय लष्कराने ही कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना #SurgicalStrikes ची माहिती दिली होती.