पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान
पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. या टप्प्यात 49 जागा असून 345 उमेदवार रिंगणात आहेत.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. या टप्प्यात 49 जागा असून 345 उमेदवार रिंगणात आहेत.
उत्तर चोवीस परगणा आणि हावडा जिल्ह्यातील हे मतदारसंघ आहेत. राज्याचे अर्थमंत्री अमित मित्रा आणि माजी अर्थमंत्री मदन मित्रा हे या टप्प्यातील दिग्गज उमेदवार आहेत.
शारदा चिट फंड गैरव्यवहारात सध्या अलिपूर कारागृहात असलेले मदन मित्रा उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील कमरहाटीतून रिंगणात आहेत. सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे पाच मंत्रीही या टप्प्यात मैदानात आहेत.