नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी जवानांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं आहे. जवानांच्या या स्वागताचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरलं झाला आहे.


भोपाळमध्ये शौर्य स्मारकाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबाला आदरयुक्त वागणूक द्यायचं आवाहन केलं होतं. परदेशामध्ये विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनवर जवान आले तर त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं जातं, असंही मोदी या कार्यक्रमात म्हणाले होते. परदेशामध्ये घडणाऱ्या अशाच गोष्टीचा प्रत्यय दिल्ली विमानतळावर आला आहे.


पाहा काय झालं दिल्ली विमानतळावर