चेन्नई : जयललिता जयराम... तामिळनाडूच्या राजकारणावर गेल्या तीन दशकांपासून स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या नेत्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी जयललिता यांचं निधन झालंय. एमजी रामचंद्रन यांच्या समाधी शेजारीच 'अम्मां'चा अंत्यविधी आणि दफनविधी पार पडला. पण, याच एमजी रामचंद्रन यांच्या अंत्यविधी दरम्यान जयललिता यांचा अपमान करण्यात आला होता.  


१९८७ साली 'एआयएडीएमके'चे नेते एम जी रामचंद्रन यांचा मृत्यू झाला त्यावेळी, एमजीआर यांच्या तिसऱ्या पत्नीच्या समर्थकांकडून जयललिता यांचा अपमान करण्यात करण्यात आला होता. परंतु, त्यांना न जुमानता जयललिता या तब्बल २१ तास राजाजी हॉलच्या बाहेर आपल्या 'मेन्टॉर'ची वाट पाहत होत्या. 



ज्या गाडीत एमजीआर यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं... त्यावर चढण्याचा प्रयत्न करत असताना एमजीआर यांच्या पत्नीच्या भाच्यानं जयललिता यांच्या डोक्यावर प्रहार केला होता. पोलिसांनी त्यांना पुन्हा गाडीत चढण्यासाठी मदत केली परंतु, त्यांना पुन्हा एकदा खाली ढकलण्यात आलं. त्यानंतर मात्र जयललितांनी एमजीआर यांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय घेतला होता.


जयललिता यांचा तोच व्हिडिओ सध्या त्यांच्या समर्थकांकडून  सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.