मुंबई :  निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंग यांचे रस्ते अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांमध्ये शोक लहर पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरंकारी संप्रदायला मानणारे जगातील विविध भागात राहतात. ज्या मॉन्ट्रियलमध्ये बाबा हरदेव यांचे कार अपघातात निधन झाले, त्या ठिकाणीही त्याचा डेरा आहे. निरंकारी संप्रदायाचे ते चौथे गुरू होते. 


दिल्ली युनिवर्सिटीत पदवी शिक्षण 


बाबा हरदेव भारतासोबत विश्वातील सर्व देशात धर्म आणि ज्ञानाचा प्रसार करत होता. त्यांनी दिल्ली युनिवर्सिटीत पदवी शिक्षण घेतले.


वडिलांच्या हत्येनंतर गादी सांभाळली


 वडील गुरबचन सिंग यांची १९८०मध्ये हत्या झाल्यानंतर बाबा हरदेव सिंग संत निरंकारी मिशनचे प्रमुख झाले. १९२९मध्ये संत निरंकारी मिशनची स्थापना झाली होती. बाबा हरदेव यांना बाबा भोला नावाने ओळखले जात होते. 



 


रक्तदानात महत्वाची भूमिका 


भारतात संत निरंकारी मिशनचे मुख्यालय दिल्लीत आहे. मिशनने आतापर्यंत सहा लाख युनिट रक्तदान केले आहे. दरवर्षी सुमारे ७० हजार युनिट रक्तदान केले जाते.