`भगवे` कपडे... `गॉगल` घालणारा `योगी`... यूपीचा मुख्यमंत्री!
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याचा शोध आता संपला आहे. मनोज सिन्हा यांचे नाव मागे पडले आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले.
रामराजे शिंदे, नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याचा शोध आता संपला आहे. मनोज सिन्हा यांचे नाव मागे पडले आणि योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले.
योगी आदित्यनाथ यांना तातडीने विशेष विमानाने लखनऊ येथे बोलवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण घडामोडीला वेगळं वगळ मिळाले. योगी आदित्यनाथ 'डार्क हॉर्स' बनले... भगवे कपडे आणि गॉगल घातलेले योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये बैठकीला हजेरी लावली... त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. यावरून योगी यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळू शकेल, असे संकेत मिळाले. विधिमंडळ पक्षनेते पदी योगी यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली. उद्या योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
कोण आहेत, अजय सिंग उर्फ योगी आदित्यनाथ?
- योगी आदित्यनाथ यांचे मूळ नाव अजय सिंग
- त्यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंड येथे झाला
- ते सध्या ४४ वर्षाचे आहेत.
- गढवाल युनिवर्सिटीतून गणितमध्ये बीएस्सी केली.
- गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे महंत
- हिंदू वाहिनीचे संस्थापक आहेत. ही वाहिनी म्हणजे हिंदू युवकांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी गट आहे.
- ग्रामीण भागातील युवक-युवतींना संघटनेत सामिल केले
- गोरक्षपीठाधिश्वर अवैद्यनाथ यांनी १९९४ मध्ये राजकारणातून संन्यास घेतला. त्यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तराधिकारी घोषित केले
- उत्तर प्रदेशात हिंदूंना एकत्र आणण्याचे काम केले
- अस्पृश्यता संपवण्यासाठी काम केले
- १९९८ मध्ये गोरखपूरमधून लोकसभा लढविली
- लोकसभेत जाणारे सर्वात तरूण खासदार
- सलग पाचव्यांदा खासदार बनले
- धर्म परिवर्तन विरोधात मोहीम सुरू केली
- 'घरवापसी' अभियानाचे प्रणेते बनले
- गोवंश संरक्षणाचे काम हाती घेतले
- १९९७, २००३, २००६ आणि २००८ मध्ये विश्व हिंदू महासंघांचे आयोजन केले.
योगी आणि वाद...
- वादग्रस्त वक्तव्य केली तरी योगी यांची ताकद वाढत गेली
- २००७ मध्ये गोरखपूर दंगलीत योगी आदित्यनाथ यांना मुख्य आरोपी बनविले
- त्यात मुस्लिमांचा मुहरम सणात गोळी चालवल्यामुळे एका हिंदू युवकाचा जीव गेला
- युवकाला श्रद्धांजली देण्यासाठी जाण्यासाठी आदित्यनाथ यांनी आग्रह केला
- त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकसुद्धा झाली
- त्याचवेळी मुंबई- गोरखपूर गोदान एक्सप्रेसमधील काही डब्बे जाळण्यात आले.
- हिंदुंचे सण कधी होणार? याची घोषणा योगी आदित्यनाथ गोरखनाथ मंदिरातून करतात
- त्यामुळे गोरखपूरमध्ये एक दिवसानंतर सण साजरे केले जातात
- लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना प्रचार करण्यासाठी विशेष हेलिकॉप्टरची सोय केली होती
- ७ सप्टेंबर २००८ रोजी आजमगड येथे आदित्यनाथ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला
- हल्लेखोरांनी शंभरहून अधिक वाहनांना घेरले होते
योगी यांची वादग्रस्त वक्तव्ये...
- लव जिहाद प्रकरण: एका हिंदू मुलींचे धर्म परिवर्तन केले तर आम्ही १०० मुस्लिम मुलींचे धर्म परिवर्तन करू : (ऑगस्ट २०१४)
- दादरी गोमांस प्रकरण : अखलाक पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर त्याच्या वर्तणुकीत फरक पडला.
- देशांतील सर्व मशिदीत गणेशमूर्ती स्थापन करणार... मक्कामध्ये मुस्लिम व्यतिरिक्त जाऊ शकत नाही, वॅटिकन सिटीत ख्रिश्चन व्यतिरिक्त जाऊ शकत नाही. आमच्यांकडे कोणाही येऊ शकतो : (फेब्रुवारी २०१५)
- हरिद्वारमधील 'हर की पौडी' येथे हिंदू व्यतिरिक्त अन्य धर्माच्या प्रवेशावर बंदी घालावी : (ऑगस्ट २०१५)
- योगला विरोध करणाऱ्यांनी भारत सोडून द्यावे. सूर्य नमस्कार न मानणाऱ्यांनी समुद्रात उडी मारून जीव द्यायला पाहिजे