पर्रिकरांसाठी कोण देणार आमदारकीचा राजीनामा...
संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेले मनोहर पर्रीकर सध्या राज्यसभेचे खासदार आहेत . मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्याना गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडून यावं लागेल
पणजी : संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेले मनोहर पर्रीकर सध्या राज्यसभेचे खासदार आहेत . मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्याना गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडून यावं लागेल
यासाठी ते पणजी किंवा म्हापसा या मतदारसंघाची निवड करू शकतात . पणजी मतदारसंघातून १९९४ पासून ते यापूर्वी पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१५ मध्ये संरक्षणमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर त्याचे सचिव राहिलेल्या सिद्धार्थ कुंकळयेकर हे भाजपच्या तिकिटावर पणजी मतदारसंघातून विजयी झाले होते .
पर्रीकरांसाठी कुंकळयेकर आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहेत. याबरोबर पर्रीकर म्हापसा मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात. भाजपचे आमदार फ्रांसिस डिसुझा आरोग्याच्या कारणावरून राजीनामा देण्याची शक्यता आहे.
आमदार डिसुझा यांची प्रकृती त्यांना हवी तशी साथ देत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री राहिलेले डिसुझा राजीनामा देऊ शकतात.