बंगळुरु : सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला यांना ४ वर्ष तुरुंगात राहावं लागणार आहे. आज बंगळुरुमध्ये समर्पण करण्यासाठी त्या रवाना झाल्या. याआधी शशिकला आज जयललितांच्या समाधीवर पोहोचल्या. त्यानंतर एक वेगळंच दृष्य अनेकांना पाहायला मिळालं. शशिकला यांनी १, २ नव्हे तर ३ वेळा जयललितांच्या समाधीवर हात मारला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकला यांनी असं का केलं हा प्रश्न अनेकांना पडला. त्यानंतर अनेकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले. शशिकलांचा हा व्यवहार भूवया उंच करायला लावणारं होतं पण याबाबत नंतर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की त्यांनी असं करुन ३ शपथ घेतली.


पहिली शपथ आहे की त्या या सर्व संकटातून बाहेर येणार.
दुसरी शपथ आहे की, त्या फसवणूकीतून बाहेर येणार
तिसरी शपथ आहे की, त्या त्यांच्याविरोधातील षडयंत्रातून बाहेर येणार.


अशा प्रकारे तीन वेळा जयललितांच्या समाधीवर हात मारून त्यांनी ३ शपथ घेतल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.