राजकोट  : राजकोटमध्ये पतीच्या अंगावर पत्नी पडल्याने पतीचा दबून मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीचं वजन १२८ किलो होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नी पायऱ्यावरून उतरत होती, तेव्हा तिचा पाय घसरल्याने ती पतीच्या अंगावर पडली, पतीचा जागीच मृत्यू झाला, मात्र पत्नीचाही यात मृत्यू झाला आहे.


मंजुला विठलानी यांचं वजन १२८ किलो होतं. त्या ६८ वर्षाच्या होत्या, मंजुला यांचा मुलगा आशिष याला श्वसनाचा त्रास होत होता, त्याला  पाहण्यासाठी त्याच्या घरी जात होत्या. पायऱ्यांवरुन जात असताना पाय घसरल्याने त्यांच्या पुढे चालणारे त्यांचे पती नटवरलाल यांच्या अंगावर त्या पडल्या. 


नटवरलाल यांच्या डोक्याला जबर जखम झाली होती. तर मंजुलादेखील जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र दोघांचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती राजकोट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 
या दुर्घटनेत सासू-सासऱ्यांना वाचवण्याच्या नादात सून निशाही पायऱ्यांवरुन घसरली. तिच्या पायाला जखम झाली आहे, तिला देखील हॉस्पिटलमध्ये नेण्यातं आलंय, ती किरकोळ जखमी आहे.