अखेर तेज बहादूर यादव यांच्या पत्नीनं घेतली पतीची भेट
बीएसएफ कॅम्पमध्ये असलेल्या जेवणाच्या दर्जाचा सोशल मीडियावर झळकवणारा जवान तेज बहादूर यादव याची अखेर त्याच्या पत्नीनं भेट घेतलीय.
नवी दिल्ली : बीएसएफ कॅम्पमध्ये असलेल्या जेवणाच्या दर्जाचा सोशल मीडियावर झळकवणारा जवान तेज बहादूर यादव याची अखेर त्याच्या पत्नीनं भेट घेतलीय.
दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारनं या दोघांची भेट घडवून आणली गेली. पत्नीसोबत दोन दिवस राहण्याची परवानगीही यादव यांना देण्यात आली होती. त्यानंतर आज शर्मिला देवी यांनी आपण पतीच्या सुरक्षेबाबत आता समाधानी असल्याचं कोर्टाला सांगितलंय.
जम्मू - काश्मीरच्या सांबा क्षेत्रात सध्या तेज बहादूर यांना तैनात करण्यात आलंय. तिथंच पत्नी शर्मिला देवी यांनी आपल्या पतीची भेट घेतली. बीएसएफ वगकील गौरंग कांत यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीप्रमाणे, तेज बहादूर यांनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी एक नवीन मोबाईल विकत घेतलाय... त्यावरून फोन करण्यास त्यांना कोणतीही बंदी नाही. बीएसएफनं यादव यांचा तो मोबाईल मात्र जप्त केलाय ज्यावरून त्यांनी सोशल मीडियावरवर व्हिडिओ अपलोड केला होता. हा चौकशीचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय.
कोर्टानंही आता हा मुद्दा संपल्याचं स्पष्ट करत बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेचा निकाल लावला. त्याच वेळी 'दर वेळी शिष्टाचार पाळून प्रश्न सुटत नाहीत', असं सांगत सरकारची सौम्य शब्दांत कानउघडणीही केली.