नवी दिल्ली : मेरठमधल्या खरखौदा गावचा राहणारा युवक नोकरीसाठी सऊदी अरबला गेला होता. जेव्हा तो मायदेशी परतला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याची पत्नी घर विकून फरार झाली होती. हा युवक ३ वर्ष नोकरीसाठी सऊदी अरबला गेला होता. त्याची पत्नी आणि मुलांना त्याच्या घरी सोडून तो परदेशी गेला होता.


युवकाचं म्हणणं आहे की, सऊदी अरब वरुन त्याचं नेहमी फोनवर पत्नीसोबत बोलणं होतं होतं. कधी असा संशय आला नाही की पत्नी असं काही करेल. पत्नीला दरमहिन्याला तो २० हजार रुपये पाठवत होता. जेव्हा तो घरी परतला तेव्हा पत्नी घर विकून फरार झाली होती. घरातील वस्तू आणि दागिने देखील गायब असल्याचा आरोप युवकाने केला आहे. जेव्हा तो लोहियानगरमधील त्याच्या पत्नीच्या घरी गेला तेव्हा सासरच्या लोकांनी त्याला शिवीगाळ करुन हकलून दिलं.