VIDEO : इतकी उष्णता की जमिनीवर तयार झाले ऑम्लेट
तेलंगणा राज्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तेथील तापमान तब्बल ४० ते ४५ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेय.
करीमनगर : तेलंगणा राज्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तेथील तापमान तब्बल ४० ते ४५ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेय.
तेलंगणातील उन्हाची तीव्रता दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. तेलंगणात इतकी प्रचंड उष्णता आहे की एका महिलेने चक्क जमिनीवर काही मिनिटांत ऑम्लेट बनवले.
आपल्या घराच्या गच्चीवर तापलेल्या जमिनीवर ही महिला अंड्याचे फेटलेले मिश्रण ओतते. त्यानंतर अवघ्या काही वेळातंच हे ऑम्लेट तयार होते. हे पाहता तेथील उष्णतेची तीव्रता जाणवते. शुक्रवारी पारा ४० ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता.
पाहा हा व्हिडीओ