नवी दिल्ली : सियाचीनमध्ये बर्फात गाठले गेलेले जिगरबाज जवान लान्सनायक हनुमंतप्पा कोपड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले तरी ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. असे असताना त्यांना आपली किडनी देण्यासाठी एक महिला पुढे सरसावलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेशमधील खिरी जिल्ह्यातील बिजुआ येथील आहे. त्यांचे नाव निधी पांडे आहे. त्यांनी आपली किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपले जिगरबाज जवान वाचले पाहिजेत. त्यासाठी मी प्रार्थना करत असून माझी किडनी देण्यास तयार आहे, अशी माहिती त्यांनी एका न्यूज चॅनेला फोन करुन दिली. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.


निधी पांडे या गृहीणी आहेत. तर पती दीपक पांडे खासगी बस व्यवस्थापक आहेत. त्यांच्या पुढाकारानंतर त्यांना दिल्लीतून फोन्स येत असून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, किडनी देण्याची इच्छा माझ्या पतीची होती. मात्र माझ्या पतीने याआधी काही अवयव दान केलेत. त्यामुळे मला ही संधी मिळत आहे, असे त्यांनी म्हटलेय.