बंगळुरू : बंगळुरूत बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून रागावलेल्या एका 26 वर्षीय महिलेनं त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या या महिलेचं नाव लिडिया असं आहे. एल. जयकुमार या 32 वर्षीय तरुणाशी तिचे काही 2011 पासून प्रेमप्रकरण सुरू होतं. जयकुमार हा एका कपड्याचा व्यापारी म्हणून काम करतो.


आपल्याशी लग्न करण्यासाठी लिडिया जयकुमारनं आपला धर्म बदलावा, अन्यथा आपले आई-वडील या विवाहाला मान्यता देणार नाहीत, अशी लिडियाची मागणी होती... यानंतर जयकुमार विवाहास तयार झाला मात्र त्यानं धर्मपरिवर्तन करण्यास नकार दिला. 


त्यानंतर जयकुमार याच्या विवाहाची बोलणी त्याच्या घरी सुरू असल्याचं लिडियाला समजलं. त्यामुळे, खवळलेल्या लिडियानं याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. 


हॉस्पीटलमध्ये टॉयलेट साफ करण्यासाठी वापरलं जाणारं अॅसिड आणि शस्त्रक्रियेसाठी वापरात येणारं ब्लेड घेऊन लिडिया विजयनगर इथल्या मंदिरात दाखल झाली. प्रत्येक सोमवारी जयकुमार या मंदिरात दर्शनासाठी येतो हे तिला माहीत होतं. 


सायंकाळी 5 च्या सुमारास जयकुमार घटनास्थळी दाखल झाला... तेव्हा लिडियानं त्याच्यावर अॅसिड हल्ला केला... तसंच त्याच्या दोन्ही गालांवर तिनं ब्लेडनं वार केले... आणि तिथून पळ काढला...


प्रत्यक्षदर्शींपैंकी काहींनी जयकुमारला जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. तो सुखरुप असून पोलिसांनी लिडियाला ताब्यात घेतलंय.