कोची : श्री पद्मनाभस्वामी मंदिरात सलवार आणि चुडीदार परिधान करून आलेल्या महिलांच्या प्रवेशाला बंदी लागू करण्यात आली आहे.  केरळ उच्च न्यायालयाने प्रवेश बंदीचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता महिलांना प्रवेश बंदी कायम असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री पद्मनाभस्वामी मंदिरात सलवार आणि चुडीदार परिधान करून महिला प्रवेश करु शकणार नाही. देशातील श्रीमंत मंदिरात गणना होणाऱ्या पद्मनाभ मंदिरात आता सलवार कमीज आणि चुडीदार, पायजमा परिधान करून प्रवेश करता येणार नाही. 


केरळ उच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले की, मंदिराच्या रितीरिवाजानुसार मंदिराच्या पुजारींनी घेतलेला हा निर्णय मानावा लागेल, असे म्हटले आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी के. एन. सतीश यांना मंदिराशी निगडीत परंपरा बदलण्याचा कोणताच अधिकार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.


काही दिवसांपूर्वी सतीश यांनी परंपरांकडे दुर्लक्ष केले होते. त्यांनी महिला भाविकांना ड्रेस कोडमध्ये सूट देण्याची घोषणा केली होती. त्यांनी महिलांना सलवार कमीज आणि चुडीदार पायजमा घालून मंदिरात पुजा करण्यास परवानगी दिली होती. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी याला विरोध केला होता. 


दरम्यान मंदिराच्या तळघरात एक लाख कोटींचा खजिना असल्यावरून २०११ मध्ये केरळचे पद्मनाभवामी मंदिर चर्चेत आले होते.