बंगळुरु : ऑस्ट्रेलिया-भारत मॅचदरम्यान प्रत्येकाचं लक्ष हे रोमहर्षक सामन्याकडे होतं. प्रत्येक जण श्वास रोखून प्रत्येक बॉल पाहात होते. भारताने विजय मिळवला आणि संपूर्ण भारतीयांना आनंद झाला. पण एक घर असं होतं ज्या घरात दुखा:चं डोंगर कोसळलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरु मधील जेसीनगर मध्ये स्थानिक लोकं मोठी स्क्रिन लावून मॅच पाहत होते. त्यावेळेस तेथे जॉन केनेडी नावाचा एक व्यक्ती आपल्या कुत्र्याला घेवून तेथे पोहोचला. तो ही मॅच बघण्यात गुंग झाला. प्रत्येक जण मॅच पाहण्यात गुंतले होते पण जॉनचा कुत्रा मात्र भुंकत होता आणि मॅच पाहणाऱ्या लोकांना याचा त्रास होत होता.


काही वेळानंतर लोकांनी त्याला कुत्र्याला घेवून तेथून जाण्यास सांगितलं पण जॉनने जाण्यास नकार दिला आणि तेथे बसून राहिला. काही वेळ असाच गेला पण काही वेळानंतर एका २० वर्षीय युवकाला याचा राग आला आणि त्याने जॉनला तेथून हाकलून लावलं.


काही काळानंतर जॉन हा एका व्यक्तीला घेवून तेथे परत आला आणि त्या २० वर्षीय अविनाशवर काचेच्या तुटलेल्या बाटलीने हल्ला केला. ज्य़ामध्ये त्या युवकाची रुग्णालयात जाण्याआधीच मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येप्रकरणी जॉनला अटक केली आहे.