नवी दिल्ली :  नोट बंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने सरकार एक आणखी एक पाऊल टाकण्याचा विचार करीत आहे. हे पाऊल १२ क्रमांकाच्या आधारकार्डने सर्व प्रकारचे पेमेंट करणे शक्य होणार आहे. असे झाले तर आधार कार्ड सध्याच्या सर्व कार्ड ट्रान्सक्शनला हद्दपार करू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार डिजिटल पेमेंटला मजबूत करू इच्छित आहे.  त्या दिशेने नीती आयोग सर्व पाऊले उचलत आहेत. त्याद्वारे कोणतेही कॅश ट्रान्सक्शन हद्दपार करण्यासाठी योजना करण्यात येत आहे. 


युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDIA) चे  महासंचालक अजय पांडे यांनी सांगितले की, आधारसंबंधी सर्व ट्रान्सक्शन कार्ड रहित आणि पिन रहित होणार आहे. याच्या मदतीन अँड्रॉईड मोबाईल फोन युजर्स आपला आधार क्रमांक आणि फिंगर प्रिंटद्वारे डिजिटल ट्रान्सक्शन करू शकणार आहे. 


अजय पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार याला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पातळीवर रणनिती तयार करावी लागणार आहे.. यात मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्या, विक्रेते आणि बँकाचा समावेश होणार आहे. याच्या अमंलबजावणीसाठी सरकारने विविध क्षेत्रात काम सुरू केले आहे. 


नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांतने म्हटले आहे, आम्ही मोबाईल कंपन्यांना सांगत आहोत की भारतात कोणताही मोबाईल तयार झाला, त्यात इरीस किंवा अंगठ्याचे ठसे ओळखण्याची पद्धत असली पाहिजे. त्याद्वारे आधारकार्ड जोडले जाईल, तसेच ट्रान्सक्शन पूर्ण होईल.