जम्मू : सेल्फी घेण्याच्या नादात युवक दरीत कोसळला. रियासी जिल्ह्यात आपल्या मोबाईलवर सेल्फी घेण्याच्या नादात ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक युवक ५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. यात तो किरकोळ जखमी झाला आहे.


या घटनेची माहिती कळताच परिसरातील स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. ५० फूट खोल पडूनही तो वाचला हे चमत्कारापेक्षा वेगळे नाही, असे पोलिसांनी नमूद केले.


जानेवारीत रियासी जिल्ह्यात एका किल्ल्यावर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा पडून मृत्यू झाला होता.


विनयकुमार हा काल रियासी जिल्ह्यातील सेहादबाबाच्या जवळून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात पाय घसरला आणि तो दरीत पडला. सुदैवाने तो बचावला आहे.