मुंबई : विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाकीर नाईकच्या एनजीओचे जवळपास 100 कोटी रुपये रिअल इस्टेटमध्ये असल्याचा धक्कादायक खुलासा देखील एनआयएने केला आहे. भारत सरकारने झाकीर नाईकच्या एनजीओ आयआरएफवर बंदी टाकली आहे. सरकारने म्हटलं आहे की, नाईक त्याच्या भाषणात लादेनचं गुणगाण करायचा. इस्लामने ठरवलं असतं तर 80 टक्के भारतीय हे हिंदू नसते असं देखील झाकीर बोलायचा असं समोर आलं आहे.


झाकीर नाईकच्या ठिकाणांवर छापेमारीनंतर नॅशनल इनवेस्टीगेटीव्ह एजेंसी एनआयएने नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या वेबसाइट्स देखील ब्लॉक केल्या आहेत. एनआयएने शनिवारी झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनविरोधात एक केस दाखल करत 10 ठिकाणी छापे टाकले. गृह मंत्रालयाने म्हटलं की, 'झाकीर नाईक त्याच्या भाषणांमध्ये समाजात घृणा आणि शत्रुता वाढवण्याचा प्रयत्न करतो. सोबतच ते मुस्लीम युवा आणि परदेशातील युवकांना दहशतवादी बनवण्यासाठी प्रेरणा देतो.'


नाईकचं भाषणं हे भारताच्या विविधतेत एकता या विचाराच्या विरोधात आहे. जे लोकांना देशाच्या विरोधात जाण्यासाठी प्रेरित करतो.