मनौस : ब्राझिलमधल्या एका जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत किमान 60 कैद्यांचा मृत्यू झालाय. मनौस या अॅमेझॉन जंगलात असलेल्या गावामध्ये ही घटना घडलीये. स्थानिक ग्लोबो टीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलंय. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या दोन गँगमध्ये ही जोरदार लढाई झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता स्थिती नियंत्रणात असली तरी पूर्ण तपासाअंती मृतांचा नेमका आकडा सांगता येईल. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे असं अॅमेझॉना स्टेटचे सुरक्षाप्रमुख सर्जिओ फॉण्ट्स यांनी म्हटलंय. या घटनेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले असून ब्राझिलमधल्या तुरुंगांच्या ढिसाळ सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.