नवी दिल्ली : अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे उद्या म्हणजेच बुधवारी दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहेत. या दरम्यान गनी भारताला सैन्य सहायतेमध्ये वाढ करण्याची देखील मागणी करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परराष्ट्र मंत्रालयाने माहिती देत म्हटलं आहे की, गनी आणि मोदी यांच्यात हितसंबंधित अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. मंत्रालयाने शनिवारी म्हटलं होतं की, ही आगामी यात्रा दोन्ही देशांमधील विचार-विनिमय सुरु ठेवण्यास मदत करणार आहे.


अफगानिस्तान भारताकडून हत्यारांसहित रक्षा सहायतेमध्ये वाढ करण्याची मागणी करत होता. भारताने मागच्या वर्षी अफगानिस्तानला पहिल्यांदा चार एमआई-25 लढाऊ हेलिकॉप्टर प्रदान केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार अफगानिस्तानची ही मागणी भारत स्विकारु शकतो. याशिवाय व्यापार समुहासोबत देखील ते चर्चा करणार आहेत. दिल्लीत एका प्रतिष्ठित थिंक टँकमध्ये त्यांचं भाषण देखील होणार आहे.