कॅलिफोर्निया : सात मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय़ाचा अमेरिकेत जोरदार निषेध होतोय. गुगलच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅलिफोर्नियामधल्या माऊंटन व्ह्यू इथल्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. रशियन निर्वासित असलेले गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन हेदेखील या अनधिकृत निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. 


भारतीय आयटी क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी पहिल्याच आठवड्यात भारताला दणका देणारा निर्णय घेतलाय. एका आदेशाद्वारे अमेरिकेत काम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या H1B आणि L1 प्रकाराच्या व्हिसाचे निकष आणखी कठोर करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय आयटी क्षेत्राला फोटा फटका बसण्याची शक्यता आहे.