पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ कासव सापडला ऑस्ट्रेलियात
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या समुद्र किनाऱ्यावर अॅल्बिनो जातीचा दुर्मिळ पांढरा कासव गेल्या आठवड्यात ७ फेब्रुवारीला दिसला आहे.
क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या समुद्र किनाऱ्यावर अॅल्बिनो जातीचा दुर्मिळ पांढरा कासव गेल्या आठवड्यात ७ फेब्रुवारीला दिसला आहे.
(पाहा खाली व्हिडिओ)
क्विन्सलँडच्या कासव संवर्धन करणारी एक संस्था या भागातील कासवांची सर्वेक्षण करत असताना त्यांना हा दुर्मिळ प्रजातीचा पांढरा कासव दिसला. या प्रजातीच्या १२१ कासवांनी गेल्या आठवड्यात अंड्यातून बाहेर पडून आपला समुद्रातील प्रवास सुरू केला आहे. हा एक कासव राहिला होता.
या संस्था गेल्या नऊ वर्षांच्या कासव निरिक्षणात पहिल्यांदा हा अल्बिनो नावाचा कासव दिसला आहे.