इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव हे भारतच्या रॉ या गुप्तहेर यंत्रणेचे सदस्य असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात हेरगिरी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. 3 मार्च 2016 मध्ये त्यांना पाकिस्तानातल्या बलूचिस्तानमधल्या मश्केल इथून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानच्या फिल्ड जनरल कोर्ट मार्शलद्वारे कुलभूषण जाधव यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. 


दरम्यान कुलभूषण जाधव भारतीय हेर असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचा, भारत सरकारनं पहिल्यापासूनच इन्कार केला होता. कुलभूषण जाधव माजी भारतीय नौदल अधिकारी असून, नोकरी सोडल्यानंतर जाधव यांचा भारत सरकार तसंच भारतीय नौदलाची काहीही संबंध नसल्याचं भारत सरकारनं आधीच स्पष्ट केलंय.