वॉशिंग्टन : अमेरिका हा आता दरिद्री देश झाला आहे, जर मी अध्यक्ष झालो तर अमेरिकेला पुन्हा सर्वशक्तिमान करेन, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या ते प्रचार करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिका तुम्हाला १०० वर्षे जुनं वाटेल, तुम्ही दुबई आणि चायनामधले रस्ते आणि पायाभूत सुविधा बघा आणि न्यूयॉर्क बघा, असं ट्रम्प म्हणाले.


इस्लामिक स्टेटला संपवणं आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा तेजीत आणणं ही दोन कामं आपण निश्चित करू असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. मी अमेरिकेला पुन्हा उर्जितावस्थेत आणेन, तिसऱ्या जगातल्या देशांच्या पंक्तीत अमेरिका असेल, असा दावा त्यांनी केला आहे.