नवी दिल्ली : अमेरिकेच्या खासदाराने पाकिस्तानवर शासन करण्यासाठी जिहादी दहशतवाद आणि इतर संस्कृतीवर दडपशाही करण्याचा आरोप लावत पाकिस्तानला चांगलंच खडसावलं आहे. जर हे असंच सुरु राहिलं तर १९७१ च्या फाळणी सारख्या परिस्थितीचं सामना करावा लागेल असं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या ब्रॅड शरमन यांनी एका कार्यक्रमात म्हटलं की, जे लोकं विचार करतात कि ते इतर संस्कतीवर हल्ला करुन त्यांना संपवून पाकिस्तानला एकत्र करु शकतो तर त्यांना ढाका येथे गेलं पाहिजे.


वॉशिंग्टनमधील सिंधी फाउंडेशनने सिंधी भाषा आणि लोकांच्या सुरक्षेसाठी काम केल्याबद्दल शरमन यांचा सन्मान केला. काँग्रेसच्या या सदस्याने म्हटलं की, जर पाकिस्तान असा विचार करत असेल की, इतर संस्कृतींना संपवून भूभागातील एकता कायम राहिल तर त्यांना बांग्लादेशकडे पाहिलं पाहिजे. कराचीमधील सिंध यूनायटेड पार्टीचे अध्यक्ष सैयद जलाल मोहम्मद शाह यांनी दावा केला की, दोन राष्ट्रांच्या सिद्धांतामुळे आज पाकिस्तानमध्ये धार्मिक दहशतवाद वाढला आहे.