चीनमध्ये `अॅपल` फोन फोडले, `केएफसी`आऊटलेट्सवर हल्ला
चीनने सीमेवर भारतीय जवानांवर कितीही दादागिरी केली, तरी भारतीय चीनी खेळण्यांचा
बीजिंग : चीनने सीमेवर भारतीय जवानांवर कितीही दादागिरी केली, तरी भारतीय चीनी खेळण्यांचा आणि वस्तुंचा कधीच बहिष्कार टाकत नाहीत, पण चीनला आडव्या येणाऱ्या अमेरिकेच्या केएफसी आऊटलेटसची चीनी राष्ट्रवाद्यांनी तोडफोड केली आहे. तर अमेरिकेस विरोध दर्शविण्याकरिता अॅपल कंपनीचे फोन फोडत असल्याचेही दाखविण्यात आले.
दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा कोणताही अधिकार नसल्याचा स्पष्ट निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच सुनाविला आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यात आलेल्या संतापास आणखी भडकाविण्याचे प्रयत्न सरकारी माध्यमांकडून केले जात आहे.
दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांच्या मालकीहक्कावरुन चीनच्या फीलिपीन्स आणि इतर देशांशी असलेल्या वादचा फटका केफसी आणि अॅपल यांसारख्या कंपन्यांना बसला आहे.या वादासंदर्भात फीलिपीन्सला अमेरिकेकडूनच उत्तेजन देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
चीनमधील राष्ट्रवाद्यांनी 'केएफसी आऊटलेट बाहेर आंदोलन केलं, ते बंद करण्याची मागणी केली. याचबरोबर, येथे प्रसिद्ध झालेल्या काही छायाचित्रांमध्ये चिनी तरुण राष्ट्रवादी घोषणा देत, अमेरिकेस विरोध दर्शविण्याकरिता अॅपल कंपनीचे फोन फोडत असल्याचेही दाखविण्यात आले आहेत.