दुबई : दुबईत एक भिकारी महिन्याला ७३ हजार ५०० डॉलर एवढे रक्कम कमवत होती, अशी माहिती दुबईतील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.  दुबईमध्ये भिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. आतापर्यंत ५९ जणांना अटक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटकेत असणारा एक भिकारी महिन्याला ७३ हजार ५०० डॉलर कमवत असे, सण असताना मशिदीबाहेर अनेक भिकारी रांगेत उभे राहत असत, सणाला त्यांची मोठी कमाई होत होती.


आश्चर्याची बाब म्हणजे काही भिकाऱ्यांकडे पासपोर्ट आणि टुरिस्ट व्हिसा आढळून आले आहेत. विविध भागांमधून काही भिकारी हे कमाई करण्यासाठी येथे येत असल्याचे आढळून आले आहे. दुबईमध्ये भीक मागणे थांबविण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.