बिल गेट्स बनू शकतात जगातील पहिले खरबपती
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील पहिले खरबपती बनू शकतात. यासाठी त्यांना २५ वर्ष वाट पाहावी लागली आहे. ही माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
न्यू यॉर्क : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील पहिले खरबपती बनू शकतात. यासाठी त्यांना २५ वर्ष वाट पाहावी लागली आहे. ही माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
रिसर्च फर्म ऑक्सफेम इंटरनॅशनलनुसार जेव्हा बिल गेट्स ८६ वर्षांचे होतील तेव्हा ते जगातील पहिले खरबपती होणार आहे. या फर्मच्या रिपोर्टनुसार बिल गेट्स यांची संपत्ती २००९ पासून ११ टक्क्याने वाढत आहे.
हा जर वेग रहिला तर लवकरच जगातील पहिले खरबपती होऊ शकतात. ऑक्सफेमनुसार गेट्स यांनी २००६ मायक्रोसॉफ्ट सोडले तेव्हा त्यांची एकूण संपत्ती ५० अब्ज अमेरिकन डॉलर होती. २०१६ पर्यंत त्यांची संपत्ती वाढून ७५ अब्ज डॉलर झाली होती.
आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कामांसाठी धन देत आहेत. असे असूनही त्यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. धर्मार्थ कामाशिवाय त्यांचा समावेश अशा व्यक्तींमध्ये आहे की त्यांनी आपली निम्म्या पेक्षा अधिक संपत्ती जगाला वाटली आहे.
एका काल्पनिक विश्लेषणानुसार ऑक्सफेमच्या संशोधनकर्त्यांनी सांगितले की, २००९ नंतर त्यांची संपत्ती दर वर्षी ११ टक्क्यांनी वाढत आहे. त्यानुसार त्यांची सध्याची संपत्ती ही ८४ अब्ज डॉलर आहेत.
रिपोर्टनुसार फॉर्ब्सच्या मार्च २०१६ च्या यादीत बिलेनिअर लिस्टमध्ये आठ अरबपती आहेत. वॉरेन बफे, बिल गेट्स, इंडिटेक्सचे संस्थापक अमांसिओ ऑर्टैगा, कार्लोस स्लिम, अॅमेझॉनचे चिफ एक्झिक्युटिव्ह जेफ बेजोस, फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग,न्यूयॉर्क माजी सिटी मेअर मायकल ब्लूमबर्ग आणि ऑरॅकलचे लॅरी एलिसन यांचा समावेश आहे.