न्यूयॉर्क : अमेरिकेत राहणाऱ्या एका तरुणीनं आपला एक सेल्फी ट्विटरवर शेअर केला... आणि त्यानंतर अचानक तिला आलेल्या प्रतिक्रियांनी ती एकदम गोंधळूनच गेली... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी, जुळी बहिण आणि आई' अशा कॅप्शनखाली तिनं हा फोटो शेअर केला होता. या फोटोत तीन महिला दिसत आहेत... पण, या फोटोंतली 'आई' कोण या गोंधळात अनेक ट्विटरवासिय पडले. 


 


आता हा फोटो पाहून तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल... तर कायलाननंच हा प्रश्न सोडवलाय. अनेक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर डाव्या बाजुला काळ्या ड्रेसमध्ये असलेली महिला आपली आई आणि बाजुला जुळी बहिण असल्याचं तिनं स्पष्ट केलंय.