अरुणाचलमध्ये ब्रम्होस मिसाईल लावल्यानं घाबरलं चीन

भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये लावलेल्या ब्रम्होस मिसाईलमुळे चीन घाबरलं आहे.
नवी दिल्ली : भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये लावलेल्या ब्रम्होस मिसाईलमुळे चीन घाबरलं आहे. भारताच्या या निर्णयामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. ब्रम्होस मिसाईलमुळे पूर्वोत्तर सीमा भागात याचा नकारात्मक प्रभाव पडेल, अशी प्रतिक्रिया चीननं सांगितली आहे.
भारताची ही कारवाई आम्हाला प्रत्युत्तर द्यायला भाग पाडू शकतं, असं चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीची अधिकृत मीडिया पीएलए डेलीनं म्हणलं आहे. ब्रम्होस मिसाईलच्या रडारवर तिबेट आणि यूनान प्रांत आला आहे. तिबेट आणि जिनजियांग भागामध्ये विमानतळं, रस्ते, रेल्वे सुविधांमुळे भारतानं हे पाऊल उचलल्याचा दावाही पीएलए डेलीनं केला आहे.