दहशतवादाचा राजकीय फायदा घेऊ नका, चीननं नाक खुपसलं
दहशतवादाविरोधात केलेल्या कारवायांचा राजकीय लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं वक्तव्य चीननं करून भारताला टोला लगावला आहे.
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात केलेल्या कारवायांचा राजकीय लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं वक्तव्य चीननं करून भारताला टोला लगावला आहे. मसूद अझरला दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावरू चीननं हे वक्तव्य केलं आहे.
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याचा ठराव भारतानं संयुक्त राष्ट्रामध्ये मांडला होता. या प्रस्तावावर चीननं नकाराधिकाराचा वापर केला आणि मसूद अझरला वाचवलं.
अझरला दहशतवादी घोषित करण्याची मुदत सोमवारी संपणार होती. 15 देशांपैकी 14 देशांनी भारताच्या प्रस्तावाचं समर्थन केलं होतं, पण चीनच्या विरोधामुळे मसूद वाचला. मसूदला दहशतवादी घोषित करण्याचा ठराव चीननं आता तीन महिन्यांनी वाढवला आहे.