बीजिंग :  उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये तणावावर चिंता व्यक्त करताना चीनने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेसाठी प्रतिबद्ध राहत योग्य प्रकारे यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन चीनने केले आहे. 


चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता लू कांगने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सध्या झालेल्या हिंसक चकमकींमुळे आणि हल्ल्यांमुळे काही लोक मारले गेले आहेत. तसेच भारत पाक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आम्ही या प्रकरणी चिंतीत आहोत. आम्ही आशा करतो की दोन्ही पक्ष संयम ठेवतील. तसेच तणाव वाढू देणार नाही.