बीजिंग :  भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की अमेरिकेने दखल दिल्याने चीन-भारत वाद आणखी जटील आणि अडचणीचा होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या मते अरूणाचल प्रदेश हा तिबेटच्या दक्षिण भाग आहे. तर १९६२ च्या युद्धात चीनने काबीज केलेला अक्साई चीन भाग भारताच्या मते वादग्रस्त क्षेत्र आहे. 


अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडूच्या आमंत्रणानुसार अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा २२ ऑक्टोबरला तवांग येथे भेटीसाठी गेले होते. या संदर्भात चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लू कँगने मीडियाशी बोलताना सांगितले की अमेरिकेच्या राजदूताने वादग्रस्त भागाचा दौरा केला आहे.  चीन या दौऱ्याचा विरोध करत आहे. अमेरिकेने भारत-चीन सीमावादापासून दूर राहिले पाहिजे. 


चीनने या भागात परदेशी अधिकारी आणि दलाई लामासह भारतीय नेत्यांच्या दौऱ्याला सतत विरोध केला आहे.