वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवारी मिळवण्यास उत्सूक असलेले माजी कॉमेडियन डोनाल्ड ट्रम्प नव्या वादात अडकले आहेत. यावेळी त्यांनी भारतीयांची टींगल केली आहे. दोन दिवसांपूर्वी मेरिलँड इथं एका प्रचार सभेमध्ये ट्रम्प यांनी भारतीयांच्या इंग्रजी उच्चारांची खिल्ली उडवली होती. त्यावरून डेमॉक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली आहे. ट्रम्प हे विद्वेशाचं राजकारण करत असल्याची टीका क्लिंटन यांचे प्रचार प्रमुख जॉन पोडेस्टा यांनी केली आहे.


अमेरिकेला मित्रांची गरज आहे. अशा प्रकारे वर्णद्वेष पसरवणारा नेता या देशाला नकोय, असं पोडेस्टा म्हणालेत. अमेरिकन कंपन्यांची कॉल सेंटर्स भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये असतात, याचं उदाहरण देताना ट्रम्प यांनी भारतीयांची खिल्ली उडवली.