लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. कॅमरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा २००७ मधील घरसामान शिफ्टिंग करतानाचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पुन्हा एकदा एवढ्या वर्षांनी सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डेलीमेल' या वृत्तपत्राने याबाबतचा खुलासा केला आहे. कॅमेरुन यांचे हे छायाचित्र २००७ मधील असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी याबरोबरच त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेला लेखही दिला आहे. लंडनमधील नॉर्थ केनसिंग्टन येथून घराचे शिफ्टींग करत असताना कॅमेरुन खोके घेऊन जातानाचा हा फोटो आहे. 


सोशल नेटवर्किंगवर कॅमेरुन यांचा फोटोसह कॅमेरुन १० डाऊनिंग स्ट्रीटवरून शिफ्ट होताना कामगारांना मदत करत आहेत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता असलेल्या ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांकडून आपण शिकले पाहिजे. त्यांनी दाखविलेली मानवता आणि नम्रपणा याचा आपण आदर केला पाहिजे, असे लिहिण्यात आले आहे.