नवी दिल्ली : सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तान एलओसीवर सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान जम्मू-कश्मीरच्या सीमाभागात सतत फायरिंग करत आहे. पाकिस्तानी सेना भारतीय जवानांना निशाना बनवत आहेत. गावातील भागांना देखील पाकिस्तान सैन्याकडून निशाना बनवण्यात येत आहे. भारताने आता पाकिस्तानला या विरोधात एक पत्र दिलं आहे.  2 आणि 9 नोव्हेंबरनंतर या महिन्यात तिसऱ्यांदा विरोध पत्र देण्यात आलं आहे. सीमापलिकडे पाकिस्तानच्या चौक्यांजवळ दहशतवादी देखील जमत असल्याचं भारताने नमूद करत त्याची निंदा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेश मंत्रालयाने पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना बोलावून एक पत्र सोपलं आहे. या मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी गुरुवारी याची माहिती दिली आहे. भारताकडून संयम बाळगला जात असतांना देखील पाकिस्तानी सैन्याकडून १२ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. मागील आठवड्यात 18 ठिकाणांहून दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला. सरकारने याबाबतीत विरोध दर्शवला की पाकिस्तानी सेना एलओसीवर 14 गांवांना मुद्दामुन टार्गेट करत आहे. यामुळे ४ लोकांचा मृत्यू झाला आणि २५ लोकं जखमी झाले. संपत्तीचं देखील नुकसान झालं.


भारताने सोबतच पाकिस्तानसमोर जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांच्याबाबत चिंता व्यक्त केली. ६ आठवड्यांपासून ते चुकून एलओसीमध्ये गेले. पाकिस्तानने त्यांना लवकरात लवकर सुखरुप सोडावं असं देखील सरकारकडून मागणी करण्यात आली आहे. सरकारने म्हटलं की, पाकिस्तानकडून हार्ट ऑफ आशिया कॉन्फ्रेंसमध्ये सहभागी होण्याबाबातची माहिती नाही देण्यात आली. हे सम्मेलन 3 आणि 4 डिसेंबरला अमृतसरमध्ये होणार आहे. पाकिस्तानने सरताज अजीज यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून भारतसोबत संबंध सुधारण्यासाठी हा पहिला प्रयत्न पाहिला जात आहे.