बांग्लादेशात ISISचा दहशतवादी हल्ला, २० जणांचा मृत्यू?
भारताचा शेजारी बांग्लादेशमधल्या ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या हॉटेलला ISISच्या अतिरेक्यांनी टार्गेट केले. या हॉटेलमध्ये ५ ते ९ शस्त्रधारी हल्लेखोर घुसले. त्यांनी अनेकांना ओलीस धरत हल्ला केला. या हल्ल्याच्यावेळी ६० ओलीस पैकी २० जणांचा ठार केल्याचे वृत्त आहे. यात दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.
ढाका : भारताचा शेजारी बांग्लादेशमधल्या ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या हॉटेलला ISISच्या अतिरेक्यांनी टार्गेट केले. या हॉटेलमध्ये ५ ते ९ शस्त्रधारी हल्लेखोर घुसले. त्यांनी अनेकांना ओलीस धरत हल्ला केला. या हल्ल्याच्यावेळी ६० ओलीस पैकी २० जणांचा ठार केल्याचे वृत्त आहे. यात दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे.
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियानं (इसिस) स्वीकारली आहे. या दहशतवाद्यांनी २० परदेशी नागरिकांसह ६० जणांना ओलीस ठेवले आहे. हल्लेखोरांनी आतापर्यंत २० जणांना ठार केल्याचे वृत्त आहे.
दहशतवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या गोळीबारात इटलीचे दोन नागरिक आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांसह आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० पोलीस जखमी झाले आहेत. डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या हॉटेल बाहेर रात्री ९ वाजताच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली.
दरम्यान, ढाका येथील सर्व भारतीय अधिकारी सुरक्षित आहेत, अशी माहिती बांग्लादेशातील भारतीय उच्चायुक्तांनी दिली आहे. हल्ला ज्याठिकाणी झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसांनी हॉटेलला वेढले आहे.
सशस्त्र हल्लेखोर या भागातील होले आर्टिजन बेकरी रेस्टॉरंटमध्ये घुसले. रात्री ९.३० वाजता या ठिकाणी गोळीबार झाला. पोलिसांनी या रेस्टॉरंटला पूर्णपणे घेरले. दरम्यान, पोलीस आणि हल्लेखोर यांच्यात रात्री उशिरापासून येथे गोळीबार सुरू होता. हल्लेखोरांच्या गोळीबारात काही पोलीस आणि नागरिक जखमी झाले.
या हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटामुळे येथे प्रचंड दहशत पसरली आहे. ढाक्यातील रेस्टॉरंटमध्ये परदेशी नागरिकांसह काही जणांना ओलीस ठेवले असल्याची अमेरिकन दूतावासाकडून माहिती देण्यात आली आहे.