`ऍपलच्या प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाका`
जगभरातली प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी म्हणजे ऍपल, पण अमेरिकेमध्ये ऍपलवर बहिष्कार टाका
वॉशिंग्टन: जगभरातली प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी म्हणजे ऍपल, पण अमेरिकेमध्ये ऍपलवर बहिष्कार टाका, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार डोनॉल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
सॅन बर्नार्डिनोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणातल्या संशयिताचा आयफोन अनलॉक करण्याची अमेरिकन सरकारची मागणी होती, पण ही मागणी ऍपलनं फेटाळली, त्यामुळे ऍपलवर बहिष्कार टाका असं आवाहन ट्रम्प यांनी केलं आहे.
असा फोन अनलॉक करणं म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि खासगी आयुष्यावर घाला आहे, अमेरिकेसारख्या देशाच्या सरकारनं अशी कायदेशीर नोटीस पाठवल्यानं धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया ऍपलनं दिली आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये सॅन बर्नार्डिनोमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संशयित दहशतवादी सैयद फारूकचा मृत्यू झाला होता.
सैयद फारूककडे सुरक्षा यंत्रणांना आयफोन सापडला होता, त्या फोनमधली माहिती मिळावी यासाठी अमेरिकेनं फोन अनलॉक करायची मागणी केली होती.