दुबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या भारताच्या महिला खेळाडू पी.व्ही.सिंधू आणि साक्षी मलिक यांच्यावर सध्या बक्षिसांचा वर्षाव होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईस्थित एका भारतीय बिझनेसमननेही सिंधू आणि साक्षीला मोठे बक्षीस जाहीर केलेय.  गेल्या 40 वर्षांपासून दुबईत राहणारे मुक्काटू सेबास्टियन  यांनी रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला 50 लाखांचे बक्षिस जाहीर केलेय. तर कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षीला त्यांनी 25 लाखांचे बक्षिस जाहीर केलेय. 


रिओ ऑलिम्पिकमध्ये या दोन महिला खेळाडूंनी भारताची शान राखली. मला त्यांचा खूप अभिमान आहे. त्यामुळे त्यांना हे बक्षिस द्यायची माझी इच्छा आहे. मी काही खूप श्रीमंत नाही पण मला जितकं शक्य होईल मी तितकं करेन, असे मुक्काट्टू यावेळी म्हणाले.