काहिरा : इजिप्तमधील एका महिलेचे वजन तब्बल 500 किलो आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही महिला जगातील सर्वात लठ्ठ महिला मानली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलेक्झांड्रिया स्थित 36 वर्षीय इमान अहमद अब्दुलाती गेल्या 25 वर्षांपासून घराबाहेर पडलेली नाहीये. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, वाढलेल्या वजनामुळे ही महिला जागेवरुन तसूभरही हलू शकत नाहीये.


जेवण, कपडे बदलणे, साफ-सफाई या सर्व कामांसाठी तिला तिची आई आणि बहिणीची मदत घ्यावी लागते. 


जेव्हा इमानचा जन्म झाला होता तेव्हा तिचे वजन 5 किलोग्रॅम होते. मात्र 11 वर्षानंतर तिचे वजन झपाट्याने वाढू लागले. ते इतके वाढले की तिला स्वत:च्या पायावर उभेही राहता येत नव्हते.