वॉशिंग्टन : पगार दुपटीने वाढवल्याने आनंदित झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकाला महागडी कार दिल्याची घटना वॉशिंग्टनमध्ये घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रॅव्हिटी पेमेट्सं कंपनीचे सीईओ डेन प्राईस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढवत ७० हजार डॉलरपर्यंत केला. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत:चा पगार चक्क १.१ मिलियन डॉलरवरुन तब्बल ७० हजार डॉलरपर्यंत कमी केला. मात्र सीईओचे आभार मानण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी जे केले ते खरंच भारावून टाकणारे होते. 


डेनचे आभार मानण्यासाठी कंपनीतील १२० कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिन्यांचा पगार साठवला आणि टेस्ला मॉडेल एस ही नवीकोर गाडी गिफ्ट दिली.


कर्मचाऱ्यांनी दिलेले हे गिफ्ट पाहून डेनलाही आपल्या भावना अनावर झाल्या नाहीत. तोही आश्चर्यचकित झाला. कधीही वाटलेही नव्हते की हे शक्य होईल म्हणून. ग्रॅव्हिटीच्या कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांचा पगार साठवून माझे स्वप्न साकार केले. मी अजूनही शॉकमध्येच आहे. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. अशी प्रतिक्रिया डेन यांनी यावेळी दिली. 


डेन यांना टेस्ला कार देण्याची कल्पना होती त्याच कंपनीतील अॅलिसा ओनील यांची ती २४ वर्षीय सिंगल मदर असलेली अॅलिसा दोन वर्ष चार महिन्यांपासून ग्रॅव्हिटीमध्ये कार्यरत आहे.