महिला सबलीकरणाच्या संमेलनात इवांका ट्रम्पचा सहभाग
जर्मनीत होणाऱ्या महिला सबलीकरणाच्या शिखर संमेलनात इवांका ट्रम्प हजेरी लावू शकतात. जर्मनीच्या चांसलर अँजला मार्केल यांनी इवांकाला व्हाईट हाऊसवर जाऊन आमंत्रित केलं.
मुंबई : जर्मनीत होणाऱ्या महिला सबलीकरणाच्या शिखर संमेलनात इवांका ट्रम्प हजेरी लावू शकते. जर्मनीच्या चांसलर अँजला मार्केलनी इवांकाला व्हाईट हाऊसवर जाऊन आमंत्रित केलं. हे संमेलन एप्रिलच्या शेवटी बर्लिन येथे होणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका हिला व्हाईट हाऊसमध्ये काही जबाबदारी दिल्या गेल्या आहेत. तसंच तिला एक ऑफीसही देऊ केलंय. ती आपल्या वडीलांच्या कामात भरपूर मदत करते. त्यांना सल्ले देते, त्यांचे सल्ले घेते. वडीलांच्या खांद्याला खांदा लावून काम करते.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी आणि व्हाईट हाऊसची कर्मचारी याव्यतिरिक्तही ती समाजकार्यात सहभागी असते. मात्र वेस्ट विंग म्हणजेच एक्झ्युकेटीव्ह ऑफीसमध्ये मध्ये काम करण्यासाठी मात्र तिला कोणतंच पद किंवा मोबदला दिला जात नाही. जगभरातल्या हाय-प्रोफाईल मुलांपैकी एक तिचं नाव घेतलं जातं. ती एक यशस्वी बिजनेसवुमन आणि सेलिब्रिटी आहे.