नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर सुरु असलेल्या अभियानात एका अशा विमानवाहक जहाजाचा शोध लागला आहे जे दुसऱ्या महायुजद्धात वापरलं गेलं होतं. हे जहाज हत्यार परिक्षणासाठी वापरलं जात होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध समुद्र वैज्ञानिकांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या या अभियानात अमेरिकेच्या विमानवाहक पोत 'यूएसएस इन्डिपेंडेंस' या जहाजाचे अवशेष मिळाले आहेत. जे ग्रेटर फॅरालोन्स नॅशनल मरीन सँक्चुअरी मध्ये समुद्रात अर्ध मैल आत आहे.


समुद्राचा अभ्यास करण्यासाठी निघालेल्या नॉटिलस जहाजावर उपस्थित दोन वैज्ञानिकांनी दोन मानवरहित सबमर्सिबल समुद्राच्या तळाशी पाठवले. तेथे त्यांन एक एक हॅलकॅट लढाऊ विमान, विमानरोधी तोफ, दरवाजे आणि जहाजावर असलेलं नाव दिसलं. त्यांनी याचा एक व्हिडिओ देखील बनवला आहे.


पाहा व्हिडिओ