नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराब ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये शेवटच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, 'भविष्यात मला आशा आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणी हिंदू, महिला, यहुदी किंवा लॅटीन अमेरिकेचा व्यक्ती होऊ शकतो.' ओबामांनी देशातील विविधतेचं समर्थन करत कोणी हिंदू येणाऱ्या काळात राष्ट्राध्यक्ष बनू शकतो असं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिका सगळ्यांना समान संधी देते. ज्या व्यक्तीमध्ये क्षमता असते तो पुढे जातो. हिच अमेरिकेची ताकद आहे आणि ही संधी प्रत्येकाला मिळते. अशा संधी मिळत राहिल्या तर लवकरच आपल्याला एक महिला राष्ट्राध्यक्ष किंवा लॅटिन, यहूदी किंवा एक हिंदू राष्ट्राध्यक्ष मिळेल. ओबामांना जेव्हा विचारण्यात आलं होतं की भविष्यात कोणी कृष्णवर्णीय अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो का ? या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी हे म्हटलं.


ओबामांनी म्हटलं की, 'आपण सगळ्यांना संधी देणं सुरु ठेवलं आहे. काही काळात आपल्याकडे वेगवेगळ्या समुदायाचे क्षमता असलेले लोकं असतील. हे त्या व्यक्तींनाही माहित नसेल की येणाऱ्या काळात ते या खूर्चीवर बसतील.'