कराची : पाकिस्तानात एक अनोखा किस्सा घडलाय. दहशतवादी विरोधी पथकाने एका आरोपीला जेरबंद केलं, त्याची सुनावणी कोर्टात सुरू होती, यावेळी आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली स्फोटकंही कोर्टासमोर सादर करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

*** वाचा संपूर्ण हिट किस्सा ***


न्यायमूर्तींच्या डायससमोर सर्व स्फोटकं ठेवण्यात आली. यात हॅण्डग्रॅनेडचाही समावेश होता.


न्यायाधिशांनी हॅण्डग्रॅनेडकडे आश्चर्याने कुतुहलाने पाहत पोलीस कॉन्स्टेबलला विचारलं, 'हा हॅण्डग्रॅनेड कसा फोडतात?',  जज साहेबांनी आपलं दुसरं वाक्य घाईघाईत उच्चारलं, 'इथंच तर फुटणार नाही ना?'


कॉन्स्टेबल म्हणाला, 'नाही', असं म्हणताना त्याने हॅण्डग्रॅनेडची पिन काढली आणि बॉम्ब तिथेच फुटला.


जज साहेब स्फोट झाल्याने घाबरून खुर्चीच्या खाली कोसळले, कॉन्स्टेबलसह कोर्टातील काही लोक जखमी झाले. अनेकांचे चेहरे काळे पडले आणि सर्वत्र धूर पसरला. तीन जण अजूनही हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.