मुलीशी लग्न करणाऱ्याला बाप देणार ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस!
आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय.
हाँगकाँग : आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय.
अनोखी अट...
सेसिल चाऊ असं या बापाचं नाव आहे. सेसिल चाऊ हे हाँगकाँगमधले एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्याच्या मुलीशी लग्न करणारा पुरुष एका झटक्यात अरबपती बनणार आहे. कारण, आपल्या मुलीशी लग्न करणाऱ्या तरुणाला ते १२ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ८,०५,७६,९४,००,००० रुपये भेट म्हणून देणार आहेत. तशी घोषणाही त्यांनी केलीय.
९ वर्षांपासून एका महिलेसोबत संबंधात
उल्लेखनीय म्हणजे, सेसिल चाऊ यांची मुलगी गिगी लेस्बियन आहे... दोन वर्षांपूर्वीच तीनं एका महिलेशी विवाह केलाय. या दोघी गेल्या ९ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
हाँगकाँगमध्ये समलैंगिक विवाहाला बंदी
पण, हाँगकाँगमध्ये मात्र समलैंगिक विवाहावर बंदी आहे. त्यामुळे, गिगी हिला तिच्या पार्टनर असलेल्या सीन ईव हिच्यासोबतचं नातं संपुष्टात आणून दुसरा विवाह करण्यासाठी पटवू शकणाऱ्या तरुणाला हे बक्षीस मिळणार आहे.