बीजिंग : मुलाशी खेळत असताना वडील चिमुकल्याच्या अंगावर पडल्याने झालेल्या दुर्घटनेत त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरमार्केटमध्ये हा चिमुकला त्याच्या वडिलांसोबत खरेदीसाठी आला होता. वडिलांच्या मागे हा चिमुकला उभा राहून खेळत होता. 


यावेळी खेळता खेळता अचानक तोल गेल्याने वडील चिमुकल्याच्या अंगावर पडले. यामध्ये चिमुकल्याच्या मानेला दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.