भारताचं समर्थन करत या ३ देशांचा सार्क परिषदेत जाण्यास नकार
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात ९ आणि १० नोव्हेंबरला होणाऱ्या १९ व्या सार्क परिषदेला जाण्यास नकार दिला आहे. भारताकडून पंतप्रधान मोदी यांनी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. भारताकडून कोणताही प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार नाही आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि भूटान या देशांनी देखील सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
नवी दिल्ली : उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात ९ आणि १० नोव्हेंबरला होणाऱ्या १९ व्या सार्क परिषदेला जाण्यास नकार दिला आहे. भारताकडून पंतप्रधान मोदी यांनी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. भारताकडून कोणताही प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार नाही आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि भूटान या देशांनी देखील सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
भारताने पाकिस्तानला एकटं पाडण्याची भूमिका जगासमोर ठेवली आहे. तर भारताचा हा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. सार्क समिटला हेड करणाऱ्या नेपाळला देखील भारताने आपला निर्णय सांगितला आहे. उडी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीमुळे भारत या परिषेदत सहभागी होणार नाही असं भारताने म्हटलं आहे.
'सीमा भागातून दहशतवादी हल्ले केले जात आहे आणि सार्क मेंबर्स देशांच्या अंतर्गत प्रकरणांवर दखल देत आहे. हे काम या संघटनेच्या एका देशाकडून होत आहे. या देशाने अशी परिस्थिती उभी केली आहे ज्यामुळे ही परिषद यशस्वी नाही होऊ शकत. भारत रीजनल को-ऑपरेशन आणि कनेक्टिव्हिटीच्या वचनावर नेहमी विश्वास ठेवतो. या मुद्द्यावर आपण तेव्हाच पुढे जावू शकतो जेव्हा दहशतवादमुक्त परिस्थिती असेल.'
विकास स्वरूप यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'रीजनल को-ऑपरेशन आणि दहशतवादी एकसोबत नाही चालू शकत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, 'आम्हाला याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. भारताचा सहभाग न घेणं हे दुर्भाग्यपूर्ण आहे. पाकिस्तान शांती आणि रीजनल को-ऑपरेशनसाठी कमिडेट आहे. तो या रीजनमधील लोकांच्या हितासाठी काम करत राहिल.'